आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Classical Singer Kishori Amoankar Gets Bhimsen Joshi Lifetime Award

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किशोरी अमोणकर यांना भीमसेन जोशी जीवनगौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा पहिलाच भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार किशोरी अमोणकर यांना जाहीर झाला आहे. शास्त्रीय गायन, वादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 5 लाख रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखालील राज्यमंत्री फौजिया खान, सांस्कृतिक खात्याचे सचिव, तसेच प्रभाकर कारेकर, सुरेश तळवलकर, उल्हास बापट, शशी व्यास, अमरेंद्र धनेश्वर यांच्या निवड समितीने अमोणकर यांची निवड केली.