आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या सदस्यांना बेकायदेशीरपणे सदस्यत्व देण्यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कुठली भूमिका बजावल्याचा पुरावा नसल्याने त्यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका घेत सीबीआयने शिंदे यांना क्लीन चिट दिली आहे.
या प्रकरणी दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी शिंदे यांनाही आरोपी करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली होती. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे अतिरिक्त आयुक्त के. बाबू यांनी शिंदे यांचे नाव आरोपपत्रात घेण्यास विरोध करणारे शपथपत्र सादर केले. वाटेगावकर यांनी प्रतिज्ञापत्रात आयोगासमोर झालेल्या साक्षींचा आधार दिला आहे. त्यांच्याकडेही शिंदेंविरुद्ध स्वतंत्र पुरावे नाहीत, याकडे सीबीआयने न्यायालयाचे लक्ष वेधले. पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार आहे.
मेजर खानखोजे प्रकरण
मेजर नारायण खानखोजे यांच्या सदस्यत्वासाठी शिंदेंनी प्रयत्न केल्याच्या आरोपाचे सीबीआयने खंडन केले. खानखोजे यांनी सदस्यत्वासाठी प्रयत्न केला व सदनिकेसाठी त्यांचा मुलगा व सुनेने पैसे मोजले. यात माजी आमदार कन्हय्यालाल गिडवाणींची भूमिका स्पष्ट होणे कठीण असल्याचे नमूद करून गिडवाणी व खानखोजे सध्या हयात नाहीत, अशा शब्दांत सीबीआयने हतबलता व्यक्त केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.