आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: तीन लाख लोकांचा शंभर शहरांत स्वच्छतेचा महायज्ञ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी महाराष्ट्रातील तब्बल शंभर शहरांमध्ये एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवण्यात अाले. यात सुमारे ३ लाख नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले हाेते. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अभियानात सहभाग नाेंदवला. ‘जमिनीवर, तळागाळात कार्य केले तर त्याचे सुंदर शिल्प लगेच समाजमनावर उमटते. प्रतिष्ठानचे कामही असे स्वच्छ आणि दर्शनी आहे. संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेत अग्रेसर करण्याचे महत्त्वाचे कार्य या प्रतिष्ठानने केले आहे,’ असे गाैरवाेद््गार फडणवीस यांनी या वेळी काढले.

मुंबईतील महात्मा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) या परिसरात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, चित्रपट निर्माते सुभाष घई, मनपा अधिकारी आदी सहभागी झाले हाेते.

अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, ‘जोपर्यंत आम्ही स्वच्छतेला मनात घर करू देणार नाही तोपर्यंत स्मार्ट सिटीज तयार होणार नाहीत. विदेशातील जनतेकडून स्वच्छतेचे धडे खरोखर घेण्यासारखे असून स्वच्छता अंगी उतरवण्याची भारतीय समाजाची मानसिकता तयार करण्याची गरज अाहे.’

अप्पासाहेब स्वच्छतादूत
रेवदंडा (जिल्हा अलिबाग) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक समाजाभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान असून राज्यभर परिचित अाहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नेतृत्वात हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...