आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह 4 किनारपट्टीलगत शहरांना जगबुडीचा धोका; क्लायमेट चेंजवर धक्कादायक अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक तापमान वाढ, हवमान बदलामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. (फाईल) - Divya Marathi
जागतिक तापमान वाढ, हवमान बदलामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. (फाईल)
मुंबई / नवी दिल्ली - जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचा सर्वात वाईट परिणाम आशिया प्रशांत महासागरीय देशांवर होणार आहे. यामुळे, 2030 पर्यंत दक्षिण भारतातील भात शेतीचे पीक 5 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यातही समुद्राची पातळी वाढत असल्याने मुंबईसह 4 तटवर्ती शहरांना बुडण्याचा धोका असल्याचे सुद्धा एशियन डेवलपमेंट बँकेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. 
 
 
- एशियन डेवलपमेंट बँक (ADB) आणि पोट्सडॅम इंस्टिट्युट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च (PIK) ने एक अहवाल जारी केला आहे. 
- त्यानुसार, आशिया खंडात सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे, या खंडात पूर, अतीवृष्टी आणि चक्रीवादळांमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक राहणार आहे. यासोबतच भारत, चीन, बांग्लादेश आणि इंडोनेशियासाठी ही धोक्याची घंटा आहे. 
- भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या तटवर्ती भागांमध्ये राहणाऱ्या 13 कोटी लोकांना जीविताचा धोका आहे. 21 व्या शतकाच्या शेवटी परिस्थिती आणखी वाईट होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...