आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेकऑफ करताना इंडिगोच्या विमानाखाली घुसले रानटी डुक्कर; वाचा नंतर काय झाले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विशाखापट्टनमहून हैदराबादला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान टेकऑफ करणार तितक्यात ‍विमानाखाली एक रानटी डुक्कर घुसले. विमानात 160 प्रवाशी आणि क्रू मेंबर्स होते.

इंडिगोच्या सूत्रांनी सां‍गितले की, विशाखापट्टनम एअरपोर्टच्या रनवेवर विमान टेकऑफ करण्याच्या तयारीत होते. तितक्यात एक रानटी डुक्कर विमानाखाली घुसले. विमानाने टेकऑफ केले परंतु नंतर विमान परत बोलवून त्याची तपासणी केल्यानंतर पुन्हा उड्डान करण्‍यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला.

काय आहे हे प्रकरण?
- काल (रविवार) ही घटना विशाखापट्टनम एअरपोर्टवर घडली. इंडिगो एअरलाइन्सचे विमान 6E-742 हैदराबादला रवाना होण्यासाठी तयार होते.  
- यादरम्यान, एक रानटी डुक्कर विमानाखाली घुसले. परंतु वैमानिकाने टेकऑफ करण्यास नकार दिला नाही.
- परंतु काही वेळानंतर विमान पुन्हा परत बोलवण्यात आले. इंजिनिअर्सने विमानाचे बारकाईने तपासणी केली. त्यानंतर विमानाला टेकऑफसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...