आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Agreed To Cut Rates Of Pulses In Cabinet Meeting

कॅबिनेटमध्ये दाल तडका!, सेनेच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री भाव कमी करण्यास राजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -डाळीच्या भाववाढीचे तीव्र पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. डाळीचे भाव भडकल्याने राज्यातील जनता सरकारवर नाराज असून कोणत्याही परिस्थितीत भाव कमी झालेच पाहिजेत, अशी भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली. त्यावरून भाजप- शिवसेना मंत्र्यांत खडाजंगीही झाली. शेवटी तूर डाळीचे भाव १२० रुपयांपर्यंत खाली आणण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर शिवसेनेचे मंत्री शांत झाले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाण्यापूर्वी शिवसेनेचे मंत्री एकत्र आले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार डाळीचे भाव कमी न केल्यासमंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसे मुख्यमंत्र्यांना पत्र या मंत्र्यांनी दिले. यावर नंतर मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करूया, बहिष्कार नको, असा पवित्रा मंत्र्यांनी घेतला.
गेल्या महिन्यात दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी डाळीचे भाव कमी करण्यासाठी भाजप पुढाकार घेत नसेल तर सरळ मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घाला, असे आदेश पक्षाच्या मंत्र्यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी उद्धव यांनी आदेशाची पुन्हा आठवण करून दिल्यानंतर सेनेच्या मंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन तसे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवले.
बैठकीत दिवाकर रावते, रामदास कदम यांनी डाळीचे भाव तातडीने कमी करा, अशी मागणी केली. यावर १३० पर्यंत भाव सात दिवसांत कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यावर १२० पर्यंत डाळीचे भाव कमी झाले पाहिजेत, असे सेनेचे मंत्री म्हणाल्याचे कळते.
साठेबाजांच्या फायद्यासाठी डाळी बंदरातच
आयात डाळींच्या बोटी बंदरात उभ्या आहेत, पण, त्या उतरवण्याचे आदेशच नाहीत. हे साठेबाजांच्या फायद्यासाठीच होत असल्याचे आरोप केले जातात, असे सेनेेच्या मंत्र्यांनी बोलून दाखवले. िवरोधकांचे हे आरोप असून त्यात काही तथ्य नाही. आपसात वाद नको, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तूरडाळ १२० रुपये किलोने मिळणार : उद्धव
आमच्या मंत्र्यांनी बैठकीत हा विषय काढून मुख्यमंत्र्यांनी भाव कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. त्यानुसार बुधवारपासून तूरडाळीचा भाव १२० रुपये केला जाणार आहे. जास्त दराने विक्री करणाऱ्यावर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.