आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Chavan Gives Best Wishes To People On Ganeshostav

गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा कायम ठेवावी : मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याला गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा आहे. या लौकिकाला साजेशा वातावरणात हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. हा गणेशोत्सव आता महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य बनला आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे संघटन आणि जागृतीसाठी सुरू केलेल्या या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आज बदलले असले तरी त्याचे महत्त्व आजच्या काळात आणि परिस्थितीतही कायम आहे.
टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामान्य जनतेच्या सक्रिय सहभागासाठी हा सण सुरू केला. आजच्या काळात गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनारोग्य, अनिती, अंधश्रद्धेविरूद्ध लढा द्यावयाचा आहे. त्यासोबतच या उत्सवाच्या काळात कुठलेही गालबोट लागणार नाही, याची काळजी आपणा सर्वांना घ्यावी. ध्वनीप्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.