आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्ती मिल बलात्कार प्रकरणी आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेमुळे गुन्हेगारांना वचक– मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शक्ती मिलच्या आवारात घडलेल्या बलात्काराच्या घटनांमधील चार आरोपींना झालेली जन्मठेपेची शिक्षा म्हणजे महिलांवरील अत्याचाराला कठोर पायबंद घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्धारावर केलेले शिक्कामोर्तब आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिली. केवळ सहा महिन्यांमध्ये या आरोपींविरूद्ध सर्व पुरावे गोळा करून ते न्यायालयात व्यवस्थित मांडल्याबद्दल त्यांनी पोलिस, त्याचप्रमाणे न्याययंत्रणा यांचेही अभिनंदन केले.
दिल्ली येथील बलात्कार प्रकरणानंतर अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता होती आणि महाराष्ट्राने अतिशय गांभिर्याने यासंदर्भात अशी पाऊले उचलली. बलात्कारातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी राज्य शासनाने याप्रकरणी केलेली कार्यवाही ही गुन्हेगारांवर अंकुश ठेवणारी असून यापुढे असे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही. महिलांवरील अत्याचाराचे खटले जलदगतीने चालावे आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील असून महिलांनी देखील अशा घटनांची माहिती त्वरित पोलिसांना देणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणतात.