आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Chavan Worked On Sunday At Mantralaya, Spend A Day

मुलीच्या लग्नाची सुट्टी काढली भरून, मुख्यमंत्री रविवारी पोहचले मंत्रालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी दिल्ली येथे दोनच दिवसांपूर्वी आपल्या कन्येच्या अतिशय साध्या पद्धतीच्या विवाह समारंभात वधुपित्याच्या भुमिकेत असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रविवारी दुपारी मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी पोचताच पुन्हा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याच्या भुमिकेत गेले आणि रविवारचा दिवस सुट्टीत न घालवता त्यांनी थेट मंत्रालय गाठले.
शनिवारीच पदाचा कार्यभार स्वीकारलेले नूतन मुख्य सचिव ज. स. सहारिया यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आणि काही म‍हत्वाचे शासकीय कामकाजही केले. मुख्यमंत्री रविवारी दुपारच्या सुमारास नवी दिल्लीहुन मुंबईत पोचले आणि लगेचच ते ‘वर्षा’ निवासस्थानी असलेल्या कार्यालयात दाखल झाले.
काही महत्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करुन त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी ‘मंत्रालयात निघण्याची तयारी करा’ असा आदेश खासगी सचिवांना दिला. सुरक्षा यंत्रणेला आवश्यक सुचना देताच काही मिनिटांतच मुख्यमंत्र्यांचा वाहनताफा मंत्रालयाच्या दिशेने रवानाही झाला.
आणखी पुढे वाचा...