आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहनिर्माण नियामक विधेयक मंजूर करा, मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॅम्पाकोला कंम्पाऊंड इमारत प्रकरणाने गृहबांधणी उद्योग क्षेत्रात प्रभावी नियामक यंत्रणेची आवश्यकता अधोरेखित केली आहे, यामुळे महाराष्ट्र विधी मंडळाच्या उभय सभागृहानी समंत करून केंद्र सरकारकडे पाठविलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण (नियंत्रण व विकास) विधेयक २०१२ ला मा.राष्ट्रपती यांची तातडीने मंजुरी घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहनिर्माण व नागरी दारिद्र्य निर्मुलन मंत्री डॉ. गिरीजा व्यास यांना पत्राद्वारे केली आहे.
डॉ. श्रीमती व्यास यांना लिहिलेल्या पत्रात श्री.चव्हाण यांनी म्हटले आहे की, कॅम्पाकोला कंपाऊंड प्रकरणामध्ये विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करण्याचे प्रकार घडले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर रहिवाशांकडून जी प्रतिक्रीया उमटली. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये गृहबांधणी क्षेत्रात प्रभावी नियामक व्यवस्था असणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकानुसार याबाबत एक अतिशय शक्तीशाली आणि विस्तृत कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्यामुळे एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रवर्तक किंवा विकासकाला त्या प्रकल्पासंदर्भात सर्व तपशील जाहीर करण्याची सक्ती होणार आहे. तसेच अशा प्रवर्तकांना व विकासकांना गृहनिर्माण नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. हे प्राधिकरण अशा विकासकांवर सर्वप्रकारचे नियंत्रण ठेवणार आहे. या कायद्याचा आणि प्राधिकरणाचा उद्देश गृहबांधणी क्षेत्रात होणाऱ्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणणे हा आहे.
आणखी पुढे वाचा.........