आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Chuavan Comment On Afzal Guru's Death Sentence

अफझलच्या फाशीचा निर्णय न्यायोचित- पृथ्वीराज चव्हाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- संसदेवरील हल्ल्याचा सुत्रधार असलेल्या अफझल गुरू याला फाशी दिल्याने न्यायोचित निर्णय झाला असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, या फाशीमुळे संपूर्ण जगभर भारत हा कोणत्याही नाही असा कणखर संदेश गेला आहे. संसदेवर 13/12 ला जो अतिशय निंदनीय हल्ला झाला त्या घटनेला मी जवळून पाहिले आहे. ज्या सुरक्षा रक्षकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून संसदेचे संरक्षण केले त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आज न्याय मिळाला अशी भावना आज माझ्या मनात आहे.

अझमल कसाबला संपूर्ण प्रक्रियेनंतर फाशीची शिक्षा देण्यात आली त्याचप्रमाणे अफझलगुरूला देशातील न्याययंत्रणेच्या माध्यमातून बचावाची कायदयाअनुसार राष्ट्रपतींपुढे देखील दयेचा अर्ज दाखल करण्याची संधी त्याला मिळाली होती. मात्र सगळ्या कायदेशीर प्रक्रियेनंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेची मान उंचावली आहे. दुसरीकडे दहशतवाद्यांना एक कठोर संदेश मिळाला. सर्व राजनैतिक अभिनिवेश बाजूला ठेऊन आंतकवादाशी मुकाबला करण्याकरिता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.