आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Davos. Looking Forward To The \'World Economic Forum\' Cm Devendra Fadanvis

मुख्यमंत्री डाव्होसला रवाना, महाराष्ट्राचे मार्केटिंग करणार- देवेंद्र फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात गुंतवणूक करणे कसे फायद्याचे आहे आणि राज्यात कशा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत याचे मार्केटिंग डाव्होसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मध्यरात्री पहाटे नवी दिल्लीतून डाव्होसला रवाना झाले. त्यापूर्वी काल रात्री उशिरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डाव्होस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या जागतिक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी केलेली निवड म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून राज्यात अधिकाधिक परकीय गुंतवणूक आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील. याचबरोबर भारतात त्यातही खासकरून महाराष्ट्रात गुंतवणुकीस कसे पोषक वातावरण आहे व माझे सरकार त्यासाठी कसे कटिबद्ध आहे याची माहिती तेथे सांगणार आहे.
देशात व राज्यात राजकीय स्थिरता असल्याने परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होतील. तसेच भारताचा वाढता विकासदर पाहता देशात मोठी गुंतवणूक होईल व त्यातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होईल असा मला विश्वास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस या फोरममध्ये प्रमुख 30 उद्योगांच्या प्रमुखांशी व त्यांच्या अधिका-यांशी एक-एक असा थेट संवाद साधणार आहेत. तसेच महाराष्ट्र गुंतवणूकीसाठी कसे हॉट डेस्टिनेशन आहे याबाबत मार्केटिंग करणार आहेत. याचबरोबर फडणवीस हे बायोटेक्नॉलॉजी, सस्टेनेबल फूड आणि वॉटर या विषयांवरही सादरीकरण करतील. महाराष्ट्र सरकार काही गुंतवणूकदारांसोबत भागीदारीत काही प्रकल्प राबविण्याचा विचार करीत आहे. त्याबाबतही फडणवीस यांनी काही विषयांची यादी तयार केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर थेट जागतिक कंपन्यांशी भागीदारीचे करार करण्याची शक्यता आहे.
पुढे आणखी वाचा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी संबंधित माहिती....