आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadanvis Aunty Shobha Wants Toll Free Maharashtra

भाजप सरकारची कोंडी: टोलमुक्तीसाठी आता मुख्यमंत्र्यांच्या काकू सरसावल्या!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सत्तेत येण्यापूर्वी भाजपने राज्यातून टोल हद्दपार केला जाईल अशी घोषणा केली होती. मात्र, भाजपचे सरकारने हा शब्द फिरवला असून, राज्यात व्यवस्थित रित्या टोलनाके सुरु आहेत. आपल्या सरकारला याचा विचार पडला म्हणून की काय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनीच आता टोलमुक्तीसाठी सरसावल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यातील बोरखेडी व मनसर टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून, येथे अवैधरीत्या वसुली करण्यात येत आहे, असा थेट आरोप आमदार शोभा फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. त्यामुळे टोलचा विषय पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या काकूंनीच यात उडी घेतल्याने भाजपमध्येही खळबळ उडाली आहे.
नागपूर जिल्ह्यात बोरखेडी व मनसर अस दोन टोलनाके बसविलेले आहेत. या मार्गावर 95 किलोमीटर रस्त्याचे काम पीपीपी तत्त्वार दिले आहे. मात्र, या रस्त्याचे आतापर्यंत केवळ 58 किलोमीटर काम झाले आहे. पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या कोणत्याही प्रकल्पाचे काम 75 टक्के पूर्ण झाल्यानंतरच त्याची वसुली करता येते. मात्र 60 टक्के काम झाले नसतानाही संबंधित कंपनीने टोल वसुली सुरु केली आहे. या कंपनीला टोल वसुलीचे कंत्राट पुढील 22 वर्ष म्हणजे 2037 पर्यंत दिले गेले आहे. तसेच 45 किलोमीटर अंतरादरम्यान केवळ 2 टोलनाके बसविण्याची गरज असताना प्रत्यक्षात 4 टोलनाके बसवून अवैध लूट सुरु आहे. त्यामुळे कंपनीने दोन वर्षांत संपूर्ण खर्च वसूल केला असल्याचे आमदार शोभा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कंपनीविरोधात कॅगने ठपका ठेवला आहे. त्यामुळे या टोलमधील भ्रष्टाचाराविरोधात आपण 21 जानेवारीला रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
या टोलनाक्याविरोधात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. जनतेच्या खिशातून मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करीत असल्यामुळे या टोलविरोधात आपण मोहिम उघडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागपूर परिसरातील जनतेत याबाबत मोठा रोष आहे हे दाखवून देण्यासाठीच आपण आंदोलन करणार आहे असेही त्यांनी सांगितले.