मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आपला वाढदिवस अतिशय साधेपणाने साजरा केला. फलक, जाहिराती किंवा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्याऐवजी जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याप्रमाणे भाजपचे सचिव संजय उपाध्याय व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून दीड लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री निधीला दिली.
आमदार संभाजी निलंगेकरांनी १ लाख, आशिष शेलार, अमित साटम यांनी प्रत्येकी २५ हजारांची योजनेला मदत दिली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार योजनेला देण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी या कर्मचाऱ्यांचे अाभार मानले. डी.वाय. पाटील लोहगाव पुणे या शिक्षण संस्थेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ११ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. या मुलांकडून नाममात्र १ रूपया फी घेऊन शिक्षण देण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरेंचीही अावाहन : ‘माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे फलक, होर्डिंग्ज न लावता अडचणीतील शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या, सामाजिक कार्यात झोकून द्या’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.