आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गड्डा यात्रेचा तिढा आज सुटणार मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या गड्डा यात्रेच्या िनयोजनावरून िजल्हा प्रशासन अाणि भाविकांमध्ये पेटलेल्या वादावर बुधवारी मुंबईत तोडगा िनघणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळास तसे अाश्वासन दिले अाहे.

सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या िशष्टमंडळात खासदार शरद बनसोडे, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार िशवशरण पाटील-बिराजदार, माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार िवश्वनाथ चाकोते, अॅड. िमलिंद थोबडे, वीरशैव संघटनेच्या अध्यक्षा उमा नाईक, सूरज हिब्बारे, प्रवीण ढेपे आणि चन्नवीर चिट्टे आदींचा समावेश होता. िसद्धेश्वर यात्रेची गेल्या ९०० वर्षांची परंपरा कशी आहे, गिनीज बुकमध्ये या यात्रेची नांेद आहे, होम मैदानाचा प्रश्न काय आहे, याबाबतची माहिती काडादी यांनी मुख्यमंत्र्यांना िदली. िजल्हाधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे यात्रेचा वाद उभा राहिला असल्याचा अाराेप िशष्टमंडळाच्या वतीने करण्यात अाला. या िवषयावर सविस्तर चर्चा केली पाहिजे. यात्रा अगदी तोंडावर आली आहे. तुमच्या भावना मी समजू शकतो. उद्याच्या उद्या आपण यावर निर्णय घेऊ. मंत्रालयात याबाबत बैठक अायाेजित करण्यात येणार असून, संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आपण पुन्हा बसू, असे मुख्यमंत्री सांगितले.
बातम्या आणखी आहेत...