आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:13 ला कोर्टात सादर करणार प्रतिज्ञापत्र, \'वर्षा\'वरील सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या, या मागणीवरून मराठा समाजाने राज्यात रान पेटवले आहे. तसेच कोपर्डी बलात्कारातील आरोपींंना फाशी द्या, या मागणीसाठी मराठा समाजबांंधव मोठ्या संंख्येने रस्त्यावर उतरले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून मराठा क्रांती मूक मोर्चे काढले जात आहेत. मुख्यमंंत्री देवेेंंद्र फडणवीस सरकारने मराठा मोर्चाचे समर्थन दिले आहे. ‍‍महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकार मराठा समाजाला अारक्षण देण्याच्या मुद्द्यावर गंभीर दिसत आहे.

यामुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अध्यक्षतेखाली 'वर्षा' बंगल्यावर सर्वपक्षीय बैठक नुकतीच संंपन्न झाली. मुख्यमंत्र्यांंनी सर्वपक्षीय नेत्यांंसोबत चर्चा केली. या मुद्द्यावरकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यावर बैठकीला चर्चा झाल्याची माहिती मिळाली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंंभीर आहे. गेल्या आठवड्यात या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली होती. येत्या 13 ऑक्टोबरला मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिवसेनेचेे नेते एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

बैठकीसाठी मराठा आरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील होते.
बातम्या आणखी आहेत...