आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadanvis Campaign Make In Maharashtra At Ghuman, Punjab

पंजाबी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी घुमानमध्ये \'मेक इन महाराष्ट्र\'चा नारा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री गुरु नानक देवजी सभामंडप, घुमान (पंजाब)- घुमान येथील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यात गुंतवणुकीसाठी पंजाबमधील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने घुमानमध्ये मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्रचा नारा देणारी पत्रके वाटली आहेत.
नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाचा नारा देत जगभरातील गुंतवणूकदारांना भारतात आकर्षित करण्यासाठी आवतन पाठवले. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही मेक इन महाराष्ट्रचा नारा देत पंजाबमधील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मेक इन महाराष्ट्राचा नारा दिला आहे. पंजाबमध्ये होणाऱ्या घुमान येथील साहित्य समेलनात महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक ब्राऊशर वाटण्यात आले आहे. या ब्राऊशरमध्ये महाराष्ट्रात उद्योजकांना मिळणाऱ्या उद्योगाच्या संधींबाबत माहिती देण्यात येत आहे.
महाराष्ट्रात उद्योगांसाठी कशी चांगले वातावरण आहे. येथील शेतीपूरक व्यवसायाला सरकार कसे महत्त्त्व देते अशी माहिती याद्वारे देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात उद्योजकांना कशा प्रकारच्या व्यवस्था पुरवल्या आहेत, याची माहितीही देण्यात आली आहे.
पंजाबी उद्योजकही आनंदी-
दरम्यान सरकारच्या या प्रस्तावाने पंजाबमधील व्यावसायिक उद्योजकांनीही आनंद व्यक्त केला आहे. पंजाबमधील उद्योजक नक्कीच महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा विचार करतील असे मत, व्यावसायिक कुलदीप सिंग यांनी व्यक्त केले.
पुढे मेक इन महाराष्ट्राच्या कॅम्पेनचा भाग म्हणून वाटलेली पत्रके पाहा छायाचित्रांच्या माध्यमातून..