आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadanvis Comment On Air India Flight Delay Issue

बदनामी थांबवली नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को/ मुंबई- एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला माझ्यामुळे उशीर झालेला नाही. मीडियातून उगाच अफवा पसरयल्या जात आहे. माझी बदनामी थांबवली नाही तर भारतात आल्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकतो, असा सज्जड इशारा महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. मात्र, अमेरिकेला जाताना मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंग परदेशी व्हिसा घरी विसरल्यामुळे विमानाचे उड्डाण नियोजित वेळेपेक्षा एक तास 20 मिनिटे लांबल्याचे वृत्त सगळीकडे प्रसिद्ध झाले होते. तसेच विमान तांत्रिक कारणातून उशिराने उडाल्याचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने याप्रकरणी स्पष्टीकरणही दिले होते.

परंतु, मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. एअर इंडिया आणि सीएमओ यांच्यात झालेल्या संभाषणाचा ई-मेल माध्यमांच्या हाती लागला आहे. त्यात विमान हे तांत्रिक कारणातून नाही तर मुख्यमंत्र्यांच्या सचिवांमुळेच विलंब झाल्याचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

भाजप नेते मस्तवाल झाले आहेत- राष्ट्रवादी
भारतीय जनता पक्षाचे नेते एअर इंडियाचा वापर मनमानीपणे वापर करत असल्याचा आरोप राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. भाजप नेत्यांच्या डोक्यात हवा गेली असून ते मस्तवाल झाले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.