आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadanvis Comment On Farmers Package Of Maharashtra

शेतकऱ्यांसाठीच्या पॅकेजवर मुख्यमंत्री ठेवणार करडी नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांना कर्जच घ्यावे लागू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेज देण्याची घोषणा विधानसभेत केली अाहे. या पॅकेजचा फायदा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे ठरवले आहे. या समितीच्या अध्यक्षपदी कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचीच निवड केली जाणार आहे. मुख्यमंत्री लवकरच समितीची घोषणा विधिमंडळात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नव्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी खते, बियाणे देण्याबरोबरच पेरणीसाठी ठराविक रक्कम दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्य देण्यात येणार असून राजीव गांधी आरोग्य विमा योजनेचा लाभही मिळवून दिला जाणार आहे. आरोग्यदायी जीवन योजनेकरिता शेतकऱ्यांना अटची अट ठेवण्यात येणार नसून केवळ त्यांच्या कार्डच्या आधारे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांनी इस्पितळात उपचार घेणे शक्य होणार आहे. या आरोग्य योजनेत गुडघा प्रत्यारोपण, हिप जॉईंट, श्रवण यंत्र यांचा समावेश करण्यात येणार असून ही नवी योजना शेतक-यांना लागू होणार आहेत. अन्नसुरक्षा योजनेत गहू आणि तांदूळ अनुक्रमे दोन आणि तीन रुपयांनी दिले जाणार आहे.

वाॅर रूमशी संलग्न, दरमहा अाढावा
सरकार कल्याणकारी योजना लागू करते परंतु त्याची अंमलबजावणी योग्यरित्या हाेत नसल्याने लाभार्थ्यांपर्यंत त्याचा फायदा पाेहाेचत नसल्याचा अाजवरचा अनुभव अाहे. ही बाब मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घेतली आहे. स्वतः मुख्यमंत्री प्रत्येक महिन्याला पॅकेजअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सोयींचा आढावा घेणार असून मुख्यमंत्री वॉर रूममध्येच या पॅकेजच्या अंमलबजावणीचा समावेश केला जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांच्या माहिती संकलनाचे काम सुरू
राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबिय, शाळेत जाणारी मुले, कॉलेजमध्ये जाणारी मुले, त्यांना द्यावे लागणारे अन्नधान्य, खते, बियाणे याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी मागवली असून त्याची एकत्रित माहिती तयार करण्याचे काम ९५ ते ९७ टक्के पूर्ण झाले आहे. या माहितीवरूनच पॅकेजचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे कामही जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्याचे समजते.