आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन आगे मर्डर: फितुर साक्षीदारांवर कारवाईसाठी सरकार हायकोर्टात दाद मागणार: मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- खर्डा (जि.नगर) येथील नितीन आगे या युवकाच्या हत्येप्रकरणी 13 साक्षीदार फितुर झाल्याने या प्रकरणातील 9 आरोपी निर्दोष सुटले आहेत. याबाबत राज्य सरकार अतिशय गंभीर असून फितुर साक्षीदारांवर कारवाईसाठी मुंबई हायकोर्टात दाद मागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 

काय आहे प्रकरण...?
खर्डा या कर्जत तालुक्यातील गावात नितीन आगे या 17 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील 9 संशयितांची अहमदनगर कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. 26 पैकी 13 साक्षीदार फितुर झाल्याने सबळ पुराव्याअभावी त्याचा निकालावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर नितीन यांचे वडील राजू आगे यांनी काल (दि. 4 डिसेंबर) मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी श्री.फडणवीस यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. खासदार अमर साबळे यावेळी उपस्थित होते. 13 फितुर साक्षीदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाईसाठी राज्य सरकार मुंबई हायकोर्टात दाद मागणार आहे. त्याबाबतचा पोलिसांचा प्रस्तावही विधि व न्याय विभागाकडून सादर करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...