आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा, पाण्याचा प्रश्न सुटला, तरी ८ हजार गावांत दुष्काळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात या आठवड्यात झालेल्या पावसामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. जूनपर्यंत पुरण्याएवढा पाणीसाठा त्यात झाला आहे. काही तालुक्यांत मात्र मार्चपर्यंतचाच पाणीसाठा आहे. या पावसामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटला असला, तरी आठ हजार गावांत अजूनही दुष्काळसदृश्य स्थिती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सोमवारी कबूल केले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

जायकवाडीचा साठा सव्वाचारवरून सात टक्क्यांवर गेला. जिल्ह्यात टँकरची संख्या १४३ वरून ६४ वर आली. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पातील जलसाठा ५३ टक्के वाढला आहे. बीड, परभणीतही पाणी आले असल्याने मोठा दिलासा मिळालेला आहे.

केंद्राकडे मदत मागणार
पाऊस होऊनही दुष्काळस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. ८ हजार गावांचा आढावा घेऊन केंद्राकडे तसा अहवाल पाठवून नव्या निकषानुसार मदत मागितली जाईल.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री