आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप करू नका, मुख्यमंत्र्यांचा ‘राष्ट्रवादी’ला टाेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मराठा समाजाचे राज्यात मूकमोर्चे निघाले. या समाजाने संयम ठेवला त्याबद्दल त्यांचे अाभार. या माेर्चामागील मराठा समाजातील आक्रोश सरकार समजून घेईल,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

‘राज्यात दलित-मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप काेणी करू नये,’ असा टाेलाही त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नाव घेता लगावला. अॅट्रॉसिटी कायदा बदलण्याची मागणी करणे चुकीचे असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी व्यक्त केले.

केंद्रीय राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल रिपाइंच्या वतीने अाठवलेंच्या नागरी सत्काराचे अायाेजन करण्यात अाले हाेते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘काँग्रेसने नेहमीच दलित समाजाला गृहीत धरले. या समाजाला न्याय देण्यासाठी अाठवलेंनी महायुतीत येण्याचा निर्णय अापले अस्तित्व पणाला लावून घेतला. ते ज्यांच्यासाेबत असतात त्यांना सत्ता मिळते. केंद्रात ज्याप्रमाणे रिपाइंला सत्तेत वाटा दिला तसाच राज्यातही महामंडळ, समित्यांवर दिला जाईल,’ असे अाश्वासनही त्यांनी दिले.

अाठवले म्हणाले, ‘काेपर्डीत जे झाले ते निंदनीयच. रिपाइंच्या कार्यकर्त्यांनीच तेथे अाराेपींना पकडून दिले. गुन्हेगारांना जात नसते, त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी अॅट्रॉसिटी बदलाची मागणी करणे चूकच अाहे. या कायद्यात अजिबात बदल हाेणार नाही. उना प्रकरणातील दलित अत्याचार प्रकरणाचे व्हिडिओ शूटिंग करून आपणच अत्याचार केल्याची कबुली देणारे आरोपी पाहिल्यानंतर यामागे निश्चितच भाजपला बदनाम करण्याचे षड््यंत्र दिसून येते. राहुल गांधी उनामध्ये गेले पण त्यांच्याच काँग्रेसच्या सत्ताकाळात राज्यात खैरलांजी वंशसंहार, खर्डा- सोनईसारखे अनेक दलित अत्याचार, मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या, हे विसरून चालणार नाही,’ हे सांगतानाच दलित अत्याचाराचे राजकारण करू नका, असे अावाहनही अाठवलेंनी केले.
उद्धव ठाकरेंनाही श्रेय
मला मंत्रिपद मिळवून देण्यात भाजपसाेबतच उद्धव ठाकरेंचाही वाटा अाहे. अागामी महापालिका निवडणुका शिवसेना, भाजप, रिपाइंने एकत्रित लढाव्यात, अशी अपेक्षा अाहे. मात्र तसे झाले नाही तर रिपाइंची भाजपशी युती कायम राहिला, अशी घाेषणाही अाठवले यांनी यावेळी केली.
बातम्या आणखी आहेत...