आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी सीएम बोलतोय.... कर्जमाफीच्या व्हायरल मेसेजची आकडेवारी चुकीची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशात ज्या इतर राज्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, त्यात त्यांनी वेगवेगळ्या अटी ठेवल्या होत्या, परंतु आम्ही कर्जमाफी देताना कोणतीही अट ठेवली नाही, यामुळे महाराष्ट्रातील 36 लाखांहून जास्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, अशी माहिती सीएम देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी "मी मुख्यमंत्री बोलतोय" या कार्यक्रमातून दिली.
-या कार्यक्रमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन केले. अगोदर अल्पभूधारकांना कर्जमाफी जाहीर केली होती, परंतु इतर शेतकऱ्यांचा प्रश्न समोर आल्याने सरकारने सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्याचे ते म्हणाले. 
 
व्हायरल मेसेजची आकडेवारी चुकीची
सोशल मीडियात कर्जमाफीच्या आकडेवारीसंबंधी चुकीची माहिती फिरत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या मेसेजमध्ये सांगितलेली आकडेवारी चुकीची असून प्रत्यक्षात पूर्ण अभ्यासाअंती कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. 
कर्जमाफीसाठी जमिनीची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नसून या योजनेसाठी सर्व जणांना पात्र ठरवण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या कर्जमाफीमुळे 36 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
 
कर्जमाफीचा दुरुपयोग होऊ नये यासाठी खास उपाययोजना
कर्जमाफीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून खास उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील तसेच प्रत्येक बँक खात्याची आधार क्रमांकावरून पडताळणीही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
 
हेही वाचा
बातम्या आणखी आहेत...