आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांची वॉर रूम, खास मोबाइल अॅपही!, प्रकल्पांवर स्वत: कायम लक्ष ठेवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भले मोठे दालन. आत मोठा कॉन्फरन्स टेबल, प्रोजेक्टरसह अत्याधुनिक सुविधा. दालनाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर राज्यातील सर्व प्रमुख प्रकल्पांची छायाचित्रांसह इत्थंभूत माहिती. त्याखाली प्रकल्प सुरू करण्याची आणि प्रत्येक टप्पा केव्हा पूर्ण होईल याची, तसेच प्रकल्प पूर्ण करण्याची संभाव्य तारीख. एवढेच नव्हे, तर कोणत्या प्रकल्पाची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याकडे याचीही माहिती, तीसुद्धा त्या अधिकाऱ्यांच्या मोबाइल क्रमांकासह…मंत्रालयातील सातवा मजला आता असा सज्ज झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यांतील प्रकल्पांवर या वॉर रूममधून लक्ष ठेवणार असून त्यांच्याच कल्पनेतून ही वॉर रूम तयार करण्यात आली आहे.

अनेक प्रकल्प धूमधडाक्यात, फिती कापून सुरू केले जातात, पण मध्येच माशी शिंकते; मग काम महिनोन््महिने, वर्षानुवर्षे रखडते किंवा प्रकल्प गुंडाळला तरी जातो. यात प्रशासनाचा वेळ आणि पैसाही वाया जातो. हे टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व योजनांवर स्वतः लक्ष ठेवण्याचे ठरवून वॉर रूम तयार केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने दिली. मॅकेन्झी कंपनीच्या मदतीने हे वॉर रूम तयार करण्यात आली असून प्रत्येक प्रकल्पाच्या दैनंदिन कामाची माहिती मुख्यमंत्री घेत असतात. एखाद्या प्रकल्पाचे कुठेही काम अडले तर मुख्यमंत्री स्वतः संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांशी बोलून काम मार्गी लावतील. या प्रकल्पांबाबत प्रत्येक दोन-तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री वॉर रूमध्ये बैठक घेऊन कामाचा आढावाही घेण्यात येणार आहेत.

कामांना गती देण्याचा उद्देश
राज्यातील विविध पायाभूत प्रकल्प, कृषी-शिक्षण व अन्य विभागांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामांना गती मिळावी, कामे वेळेत व्हावी, त्यासाठी केंद्र-राज्यांच्या विविध विभागांत समन्वय असावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या या वॉर रूमची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. राज्य सरकारने गतिमान प्रशासनासाठी प्रयत्न सुरू केले असून ही वॉर रूम व विशेष मोबाइल अॅप त्यासाठी साह्यभूत ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी मोबाइल अॅप
प्रकल्पांची माहिती रोज व्हावी यासाठी एक मोबाइल अॅपही फक्त मुख्यमंत्र्यांसाठी तयार करण्यात आले आहे. कामात अडचण आली तर मुख्यमंत्र्यांना अॅपच्या माध्यमातून तत्काळ ही माहिती मिळेल.

या योजना टार्गेट
1 महत्त्वाकांक्षी सोलर पंप योजना
2 सिडकोची परवडणारी घरे
3 एलिफंटा लेण्यांचा विकास
4 नवी मुंबई विमानतळ
5 भेंडी बाजार पुनर्विकास
6 गोरेगाव-मुलुंड लिंक रोड
7 छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (३१ मे २०१९ पूर्णत्वाची तारीख)
8 मुंबई ट्रान्स हार्बर प्रकल्प
9 कळवा-कल्याणचा इकॉनॉमिक ग्रोथ हब प्रकल्प
10 फिल्मसिटी मॉडर्नायझेशन
11 बीकेसीचा औद्योगिक विकास

सर्व प्रकल्प चार वर्षांत पूर्ण
^ वॉर रूममध्ये युद्धस्तरावर प्रकल्पांची माहिती घेतली जाणार असल्याने प्रकल्प वेळेवर पूर्ण होणे शक्य आहे. राज्यातील सर्व प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले असून त्यासाठीच ही वॉर रूम तयार करण्यात आली आहे.
- स्वाधीन क्षत्रिय, मुख्य सचिव
बातम्या आणखी आहेत...