आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चात प्रस्थापित नेत्यांना स्थान नाही-CM, शरद पवार म्‍हणतात- मी राज्‍यकर्ता नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्‍यात निघणा-या मराठा समाजाच्‍या मोर्चांवर आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. या मोर्चाचा रोष हा आघाडी सरकारविरोधात असल्याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले आहे. ”गेल्‍या 15 वर्षांतील सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे जे झाले त्याविरोधातील हा असंतोष आहे. आम्ही राज्याची सुत्रे हाती घेऊन दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आला. हा कालावधी हा अपुरा आहे. पण सरकार म्हणून आम्ही याकडे संवेदनशीलपणे पाहत आहोत. असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सह्याद्री’ वाहिनीला मुलाखत देऊन मराठा मोर्चा, मराठा आरक्षण यांसह विविध विषयांवर मत मांडले. मराठा समाजाचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवू, त्यासाठी प्रतिमोर्चे काढण्याची गरज नाही असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. या निमित्‍ताने कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी नेत्‍यांना टोला लगावण्‍याची संधीही त्‍यांनी सोडली नाही, मराठा मोर्चात प्रस्थापित मराठा नेत्यांना स्थान नाही, असे म्‍हणत त्‍यांनी हा टोला लगावला. मुख्‍यमंत्र्यांच्‍या या मुलाखतीवर सामाजिक व राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रीया येत आहेत.
काय म्‍हणाले अजित पवार..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही आता आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत मांडले. ते म्‍हणाले ‘अनेकांना आरक्षण हवे असते मात्र, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा सर्वजण आरक्षण लपवून आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत याचाच खटाटोप करत असतात.’ बारामती पंचायत समितीच्या वतीने मोरोपंत सभागृहात आयोजित आर्दश शिक्षकांच्‍या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन वाचा, मुख्‍यमंत्री फडणवीस, शरद पवार व भय्युजी महाराज काय म्‍हणाले..
बातम्या आणखी आहेत...