आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadanvis Meetinh With Microsoft CEO Satya Nadella At Microsoft In Seattle

US दौरा: मायक्रोसॉफ्ट ‘स्मार्ट एमआयडीसी’सह पुण्यात सायबर सुरक्षा केंद्र उभारणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- सिॲटलमधील मायक्रोसॉफ्टच्या सायबर क्राइम सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांची भेट घेतली. यादरम्यान, नाडेला यांच्याशी राज्याच्या शिष्टमंडळाची अतिशय सकारात्मक चर्चा झाली. - Divya Marathi
छायाचित्र- सिॲटलमधील मायक्रोसॉफ्टच्या सायबर क्राइम सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांची भेट घेतली. यादरम्यान, नाडेला यांच्याशी राज्याच्या शिष्टमंडळाची अतिशय सकारात्मक चर्चा झाली.
सिॲटल- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट या समुहाने राज्यात एक स्मार्ट औद्योगिक वसाहत तसेच पुणे येथे सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल व्हिलेज या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत कंपनीने मान्य केले.
मुख्यमंत्र्यांनी सिॲटलमधील मायक्रोसॉफ्टच्या सायबर क्राइम सेंटरला भेट दिली. या भेटीदरम्यान मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्याशी राज्याच्या शिष्टमंडळाची अतिशय सकारात्मक चर्चा झाली. लघु व मध्यम उद्योगांसाठी तंत्रज्ञानविषयक सहाय्य, क्लाउड सर्व्हिसेस, सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर या भेटीत विचारविनिमय करण्यात आला. राज्याच्या प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत नाडेला यांनी महाराष्ट्र सरकारची विशेष प्रशंसा केली. पुणे येथे सायबर सुरक्षा केंद्र तसेच राज्यात एक स्मार्ट औद्योगिक वसाहत उभारण्यात येईल, असे यावेळी मायक्रोसॉफ्टतर्फे सांगण्यात आले. स्मार्ट औद्योगिक वसाहतीसाठी कंपनीकडून लवकरच जागेची निश्चिती करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या डिजिटल व्हिलेज उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही कंपनीतर्फे मान्य करण्यात आले. पथदर्शी प्रकल्प म्हणून मेळघाटातील एक आदिवासी खेडे दत्तक घेऊन त्यास विशेष आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे यावेळी सांगण्यात आले.
मुंबईत दोन मोठी डाटा सेंटर्स उभारल्यानंतर मायक्रोसॉफ्ट आता राज्याच्या सुरक्षिततेसाठी विशेष ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या ॲप्लिकेशनमुळे सुरक्षिततेविषयक सहाय्याची गरज असणाऱ्या राज्यातील लोकांचा शोध घेऊन त्यांना शासकीय यंत्रणेकडून तत्काळ सुरक्षा पुरविणे शक्य होणार आहे, अशी माहिती कंपनीने शिष्टमंडळास दिली. मायक्रोसॉफ्टच्या डाटा सेंटर्सनी मेक इन महाराष्ट्रसाठी दिलेल्या योगदानाची मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशंसा केली.

मुख्यमंत्र्यांनी बोईंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेमंड कॉनर यांचीही भेट घेतली. नागपूरजवळच्या मिहानमध्ये असलेल्या बोईंगच्या एमआरओ प्रकल्पाला गती देण्याबाबत या भेटीत चर्चा झाली. महाराष्ट्रात नागरी हवाई वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार आखत असलेल्या योजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी कॉनर यांना माहिती दिली. शासनाच्या या उपक्रमात सहयोग देण्याचे बोईंगने मान्य केले. तसेच नागपूरसह राज्यात याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्यासही सहमती दर्शवली.
पुढे आणखी वाचा, यासंदर्भातील माहिती...