आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadanvis Meets Global Business Tycoons At Davos

दावोस: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्र्यांची उद्योग समुहांशी चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दावोस (स्वित्झर्लंड) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 45 व्या वार्षिक परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विविध उद्योग तसेच आर्थिक समुहांच्या प्रमुखांशी महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या उभारणीसाठी सहकार्य घेण्याबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी पहिल्या सत्रात नोमुरा या वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या समुहाचे अध्यक्ष मिनोरू शिनोहारा तसेच या समुहाचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी विकास शर्मा यांच्याशी चर्चा केली. मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडच्या उभारणीसाठी तसेच राज्यातील विकसित होणाऱ्या शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी या समुहाचे सहकार्य घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी या चर्चेत चाचपणी केली.
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी या चर्चेत सहभागी झाले. त्यानंतरच्या सत्रात विविध उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. त्यात जनरल इलेक्ट्रीक, नेस्ले, ह्योसंग, पेप्सीको, लॉरीयल, इस्पात, जेट्रो, डब्ल्यूईएफ, मित्सुई, नोवार्टिस, सॅफ्रन, कॉग्नीझंट आदी उद्योग समुहांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री या परिषदे दरम्यान अनेक प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असून परिषदेत सहभागी होत असलेल्या विविध जागतिक उद्योग समुहांच्या प्रमुखांचीही राज्याचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. विविध उद्योगांसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यासह राज्यातील प्रस्तावित प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचे सहकार्य घेण्याबाबतही प्रयत्न केले जातील. त्यासोबतच महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढविण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे.
पुढे वाचा, यंदाच्या परिषदेचे सूत्र ‘न्यू ग्लोबल कंटेक्स्ट’...