आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्रिकेट’चे पैसे नाकारले; बॉलीवूडला मात्र अनुकूल; CM च्या भूमिकेवर क्रिकेट चाहत्यांची नाराजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दुष्काळाचे कारण देत या वर्षी मुंबई महाराष्ट्रात हाेणारे १३ ‘अायपीएल’ सामने इतर राज्यांत हलवण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. या निर्णयामुळे राज्य सरकारने क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून कराच्या रूपाने मिळणाऱ्या सुमारे १५० काेटी रुपयांच्या महसुलावरही पाणी साेडले हाेते. त्या वेळी बीसीसीआय, मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या संघटनांनी दुष्काळ निवारणासाठी प्रत्येकी पाच-पाच काेटी रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शवली हाेती.

मात्र सरकारने तीही नाकारली. मग अाता देशभरात पाकिस्तानविराेधी वातावरण असतानाही तेथील कलाकारांचा समावेश असलेल्या ‘ऐ दिल हे मुश्किल’ या चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी कशी काय दिली जाते, लष्कराच्या निधीत पाच काेटी रुपयांचा निधी देण्याबाबत बाॅलीवूडकरांचा प्रस्ताव स्वीकारून देशप्रेमाशी तडजाेड कशी काय केली जाते, असा प्रश्न क्रिकेटप्रेमी उपस्थित करत अाहेत.
महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष असताना आयपीएल सामन्यांसाठी, मैदानावर मारण्यात येणारे त्यानिमित्त वापरात येणारे पाणी, यांचा अपव्यय टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने १३ आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर नेण्याचा आदेश दिला होता. प्रक्रिया केलेले पाणी मैदानावर वापरात येत असल्याचा किंवा वापरात आणण्याचा दावा बीसीसीआय यजमान असोसिएशन (मुंबई, पुणे विदर्भ) फ्रँचायझी करीत असले तरीही, प्रत्यक्षात त्यावर देखरेख ठेवणे, लक्ष ठेवणे, नियंत्रण ठेवणे कठीण आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वापरल्यास परवानगी देण्याच्या मन:स्थितीत असलेल्या न्यायालयाने सामने महाराष्ट्राबाहेर नेण्याचा आदेश दिला होता. मुंबई पुणे संघ, मुंबई महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन्स यांनी दुष्काळग्रस्त निधीसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये मदत देण्याची तयारी दर्शवली होती. मैदानासाठी वापरात येणाऱ्या पाण्याइतकेच शुद्ध पाणी दुष्काळग्रस्तांना देण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली होती. पण तीही नाकारण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...