आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची तलवार ‘म्यान’; विराेधक राज्यपालांच्या दारी, राजीनामे खिशातून काढून ठेवले: कदम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीचे निवेदन रविवारी राज्यपालांना देताना विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ अामदार गणपतराव देशमुख, भाई जगताप व इतर. - Divya Marathi
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीचे निवेदन रविवारी राज्यपालांना देताना विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ अामदार गणपतराव देशमुख, भाई जगताप व इतर.
मुंबई - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन साेमवारपासून सुरू हाेत अाहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या अात्महत्या वाढत असल्याचा अाराेप करत कर्जमाफीच्या मागणीवरून या अधिवेशनात फडणवीस सरकारला धारेवर धरण्याची रणनीती विराेधकांनी अाखली अाहे. दुसरीकडे सत्तेत असूनही अाजवर कर्जमाफीच्या मागणीसाठी सरकारला धारेवर धरणाऱ्या व खिशात राजीनामे घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने तूर्तास हा मुद्दा ‘म्यान’ केल्याचे दिसते. दरम्यान, ‘अाम्हीही कर्जमाफीच्या बाजूने अाहाेत. शेतकऱ्यांनाच फायदा हाेईल, असा निर्णय याेग्य वेळी घेऊ,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अाहे.
 
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहांचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचे निवेदन दिले. ‘शेतकरी अात्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत. राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमाफीबाबत घाेषणा व्हावी,’ अशी मागणी विराेधकांनी केली अाहे.  मुख्यमंत्र्यांनी मात्र विराेधकांकडे दुसरा मुद्दा नसल्याने ते कर्जमाफीची मागणी करत असल्याचा अाराेप केला.
 
५८% शेतकरी आत्महत्या केवळ कर्जबाजारीपणामुळे 
एनसीआरबीनुसार २०१५ मध्ये महाराष्ट्रात एकूण ३,०३० शेतकरी आत्महत्या झाल्या. यातील ५८ % अात्महत्या या केवळ कर्जबाजारीपणाच्या कारणामुळे झाल्या. 
 
२००८ च्या कर्जमाफीपासून १५,५१० शेतकरी आत्महत्या
२००८ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे ७  हजार कोटींचे कर्ज माफ झाले. तेव्हापासून गतवर्षी सप्टेंबरपर्यंत एकूण १५,५१० शेतकरी आत्महत्या. 
 
२०.५% वाटा महाराष्ट्राने जीडीपीतून कृषी कर्जासाठी दिला आहे. पंजाब, यूपीत हे प्रमाण ३१% व  ३०% आहे. यूपीत भाजपने कर्जमाफीचे अाश्वासन दिले अाहे.
 
यंदाचाही अर्थसंकल्प कृषिप्रधान : अर्थमंत्री
राज्याचा अर्थसंकल्प येत्या १८ मार्चला सादर हाेईल. त्यात कृषी आधारित रोजगारावर भर राहील, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात एकूण ४ कोटी ५५ लाख मजूर आहेत. त्यापैकी २ कोटी ६० लाख शेतीशी संबंधित आहेत. त्यामुळे कृषीआधारित रोजगार निर्मितीवर भर राहील.
 
संकट टळले : शिवसेना- भाजपतील वाढत्या तणावाचा फायदा घेत राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे डावपेच विराेधकांनी अाखले हाेते. मात्र अधिवेशनाच्या दाेन दिवस अाधीच सत्ताधारी मित्रपक्षांमधला तणाव निवळल्याने हे संकट अाता दूर झाले अाहे. परिस्थितीचा अंदाज अाल्यामुळे सरकारवर अविश्वास ठराव अाणणार नसल्याचे जाहीर करण्याची वेळ विराेधकांवर अाली.
 
पुढील स्लाईडवर वाचा, राजीनामे खिशातून काढून ठेवले : रामदास कदम...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...