आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadanvis Reply To Uddhav Thackeray, Sena Back Fire

संकटकाळी पाठीशी असतो तोच खरा मित्र, फडणवीसांचा उद्धवना टोला, सेनेचाही पलटवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नाशिक- भारतीय जनता पक्षाचा दिल्लीत पराभव झाल्याने अनेकांना आनंद झाला आहे. मात्र, दुस-याच्या घरात पोरगं जन्मलेल्याचा फार दिवस आनंद राहत नाही. संकटकाळी जो आपल्या पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र असतो अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. दरम्यान, फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेने जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. खरा राजकीय मित्र कसा असतो याचे उदाहरण शिवसेनेने देशासमोर ठेवले आहे. 25 वर्षे आम्ही भाजप जेव्हा जेव्हा संकटात होता तेव्हा तेव्हा मनापासून साथ दिली पण तीन महिन्यापूर्वी भाजपने आमच्यासोबत कशी वागणूक केली हे सगळ्या देशाने पाहिले आहे तेव्हा ख-या-खोट्या मित्राची गोष्ट न केलेली बरी असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात आहेत. पोलिस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांची एक मोठी मॅच बाहेर पडत आहे. त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी फडणवीस आले आहेत. त्यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी यावर भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, दिल्लीतील पराभव आम्ही मान्य केला आहे. आम्ही पराभवाचे आत्मचिंतन करून झालेल्या चुका दुरुस्त करू. हा पराभव पक्षाचा आहे असे सांगत फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पराभवासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले. यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत व सामनातून दिलेल्या सल्ल्यांबाबत छेडले असता मुख्यमंत्री म्हणाले, कोणी काय म्हणते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. जो तो आपल्या परीने एखाद्या विषयावर मते मांडत असतो. तो ज्याला त्याला दिला गेला पाहिजे. मात्र, जो मित्र संकटकाळी आपल्या पाठीशी उभा असतो, तोच खरा मित्र असतो. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाष्यांवर मी मत व्यक्त करावे असे काही नाही. मात्र ते आमचे सहकारी व मित्र पक्ष आहेत. दुस-याच्या घरात जन्मलेल्या मुलाचा फार काळ आनंद व्यक्त करता येत नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा पराभव मोदींचा नसून पक्षाचा असल्याचे सांगनून फडणवीस म्हणाले, उद्या एखाद्या महापालिकेत पराभव झाला तर तो उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला असे कसे म्हणता येईल.
पुढे वाचा, संजय राऊतांनी फडणवीसांना आठवण करून दिली विधानसभेतील दगाफटक्याची...
फडणवीस म्हणाले, शरद पवारांबाबत अस्पृश्यता कशासाठी?...