आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी हा वरवरचा उपाय; सरकारचे धोरण शाश्वत शेतीसाठी प्रयत्न करणे; मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमाफी हा रामबाण उपाय नाही. अनेक उपायांपैकी हा वरवरचा उपाय आहे. सन २००८ साली कर्जमाफी झाली, तेव्हा खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट होती, त्यांना कोणताही लाभ झाला नव्हता. आपण कर्जमाफी करतो म्हणजे पुन्हा एकदा कर्ज घेण्यास शेतकऱ्यांना पात्र करतो. म्हणून भाजपा सरकारचे धोरणही शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकरी कर्जबाजारी हाेऊ नये असेच अाहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. 
    
‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी साधलेला संवाद रविवारी सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरून प्रदर्शित करण्यात अाला. पहिल्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संकल्प शाश्वत शेतीचा’ या विषयाच्या अनुषंगाने ई- मेल, व्हाॅटस ॲपद्वारे आणि थेट विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘शेतीला शाश्वत वीज, या गोष्टीवर भर देऊन शेतीमधील उत्पादकता वाढविणे,उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न वाढविण्यावर भर देणे आवश्यक अाहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...