आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट नागपूरसाठी ‘सिस्को’सोबत करार; सुरक्षित महाराष्ट्रासाठी ‘गुगल’शी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट करण्यासाठी राज्य सरकारने सिस्को या नेटवर्किंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीशी सॅन फ्रान्सिस्को येथे सामंजस्य करार केला. - Divya Marathi
नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट करण्यासाठी राज्य सरकारने सिस्को या नेटवर्किंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीशी सॅन फ्रान्सिस्को येथे सामंजस्य करार केला.
सॅन फ्रान्सिस्को- देशभरात डिजिटल इंडिया सप्ताहास प्रारंभ झाला असतानाच महाराष्ट्र अधिक स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आज राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले. या प्रयत्नांचा पहिला टप्पा म्हणून नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट करण्यासाठी राज्य सरकारने सिस्को या नेटवर्किंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीशी सॅन फ्रान्सिस्को येथे सामंजस्य करार केला. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी उपयुक्त ठरु शकणाऱ्या विविध सेवांबाबत गुगल कंपनीशीही सकारात्मक चर्चा केली.
सिस्को ही नेटवर्किंग संदर्भातील साधनांची निर्मिती, संशोधन आणि विक्री करणारी अमेरिकेतील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी सीसीटीव्ही, इंटरनेट, दळणवळणाच्या प्रगत साधनांसह अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सुरक्षिततेविषयक उपाययोजना करते. नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि सिस्को यांच्यात एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नागपूर महापालिकेशी समन्वय व सहकार्याने सिस्को विविध उपाययोजना करणार आहे. त्यात अतिप्रगत दळणवळण यंत्रणा, एकात्मिक नियंत्रण, पर्यावरण विषयक तपासणी, सुधारित आरोग्य सुविधा आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र एक स्मार्ट राज्य व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. स्मार्ट झाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणि कार्यक्षमता वाढल्यावर योग्य वेळी आणि योग्य किंमतीत चांगल्या सेवा प्रदान करता येतात. त्यात वेगळा हस्तक्षेप करण्याची गरज पडत नाही. लोकांना सरकारकडून हेच अपेक्षित आहे. त्यामुळे असे स्मार्ट नेटवर्किंग उभारणे हे सरकार, संस्था आणि समाजाच्या फायद्याचे आहे. संपूर्ण महाराष्ट्र स्मार्ट करण्यासाठी आम्ही अधिक सहकार्याची अपेक्षा करीत आहोत.सिस्कोचे कार्यकारी उपाध्यक्ष पंकज पटेल आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे यावेळी उपस्थित होते.
पुढे आणखी वाचा, मुख्यमंत्र्यांच्या US दौ-याबाबतची माहिती....