आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबियाच्या भेटीला, शेततळ्याचीही केली पाहणी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आनंदराव दुधमल या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आनंदराव दुधमल या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.
बुलढाणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील आनंदराव दुधमल या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबातील सदस्यांसोबत आत्मियतेने संवाद साधला. घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर धीर न सोडता खंबीरपणे परिस्थितीचा सामना करा, सरकार तुमच्या पाठिशी आहे, अशा शब्दात कुटुंबियांना त्यांनी धीर दिला. शासनाच्या विविध योजनांमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लाडणापूर येथील आनंदराव सोनाजी दुधमल या शेतक-याने ऑगस्ट 2014 मध्ये आत्महत्या केली होती. गुरूवारी या कुटुंबियांना भेट देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह सरकारी अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुधमल यांची पत्नी नलिनी, मुले सुनील, गोपाल, दिनेश तसेच मुलगी पुष्पा यांच्यासोबत अर्धा तास संवाद साधला. या कुटुंबास सिंचन विहिरीसोबतच शासनाच्या सोलर पंप योजनेचा लाभ देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ देण्याचेही सुचविले. याचबरोबर लाडणापूर येथे गावातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. गावात मुबलक पाणी आहे, परंतु नियमित वीज पुरवठा नाही तसेच ठिबक सिंचन क्षेत्र वाढविणे गरजेचे असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या ऐकून आवश्यक त्या सुधारणा तातडीने केल्या जातील, असे आश्वस्त केले.
बातम्या आणखी आहेत...