आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फडणवीस व अजित पवारांचा मुंबई-औरंगाबाद विमान प्रवास एकत्र कसा? कार्यकर्ते बुचकुळ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र विमान करत विवाह समारंभाला हजेरी लावली. - Divya Marathi
मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी एकत्र विमान करत विवाह समारंभाला हजेरी लावली.

मुंबई- यापुढे मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विविध कार्यक्रमांना व्यासपीठावर बोलवणार नाही आणि आम्ही पण त्यांच्या कार्यक्रमांना जाणार नाही अशी आठवड्यापूर्वीच जाहीर सांगणारे अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोमवारी मुंबई ते औरंगाबाद असा एकत्र विमान प्रवास कसा काय केला? एकत्र येण्याचे-जाण्यामागे काय गुपित दडले आहे असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार याबाबत स्पष्टीकरण देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांचे यांचे चिरंजीव अजय आणि लोह्याचे शिवसेनेचे आमदार व नुकतेच भाजपच्या गोटात सामील झालेले प्रताप पाटील चिखलीकर यांची भाची माधुरी यांचा विवाहसमारंभ सोमवारी सायंकाळी औरंगाबादेत पार पडला. या विवाहसमारंभाला भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्याकडून अजित पवार तर प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

 

या दोघांसह अनेक राजकीय नेत्यांनी या लग्नाला हजेरी लावली मात्र चर्चा झाली तर फडणवीस आणि अजित पवार यांचीच. कारण दोघे मुंबईतून एकाच विमानातून आणि ते ही दोघेच एकत्र आल्याने चर्चेला तोंड फुटले. औरंगाबादमध्ये पोहचताच दोघे वेगवेगळ्या दिशेने एकाच विवाहसमारंभासाठी निसटले पण समारंभ आटोपून पुन्हा रात्री दोघेच एकाच विमानाने मुंबईला परतले. 

 

मुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार हे औरंगाबादमध्ये पोहचताच आपापल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात गेले. तसेच विवाहसमारंभ स्थळी मुख्यमंत्री आधी व नंतर अजित पवार गेले. या दरम्यान, ते दोघांनी आपला काही संबंधच नाही असे दाखविले. मात्र, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना अखेर कळालेच की, हे दोघे एकाच विमानात आले आहेत.  

 

मागील आठवड्यात अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले होते की, ''राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सत्कार समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हजेरीवरून आमच्यावर टीका केली आणि शंका घेतली जाते. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांपर्यंत मुख्यमंत्री किंवा भाजपच्या कुठल्याही मंत्र्याला राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला बोलावणार नाही.''

 

अजितदादांची कार्यकर्त्यांत एक थेट, स्पष्ट बोलणारा व बोललेले खरे करून दाखविणारा नेता अशी ओळख आहे. त्यामुळे अजित पवार सोडाच पण इतर नेतेही मुख्यमंत्र्यांपासून चार पावले दूर राहतील अशी खात्री कार्यकर्त्यांना होती. मात्र, केवळ आठ दिवसातच तेही थेट अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई ते औरंगाबाद व औरंगाबाद ते मुंबई असा विमान प्रवास केल्याने या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आपल्या रोखठोक स्वभावानुसार अजित पवार याबाबतही आपले स्पष्टीकरण देतील का हे पाहणे उत्सकेतेचे असेल. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या लग्नसमारंभातील अजित पवार, फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...