आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात पंचायतीच्या जाचाविरोधात CM ची अशीही शक्कल, हेवाळेकरांना पुजेचा मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षावरील गणेशाची पूजा करताना हेवाळेकर दांपत्य. - Divya Marathi
वर्षावरील गणेशाची पूजा करताना हेवाळेकर दांपत्य.
मुंबई- जात पंचायतीने गावात प्रवेश नाकारल्याने गणपती बाप्पांची मुर्ती घेऊन हेवाळेकर दांपत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान वर्षासमोर ठाण मांडले होते. या प्रकरणावर फडणवीस यांनी हेवाळेकर दांपत्याला वर्षावर बसविण्यात आलेल्या गणेशाची पूजा करण्याचा मान देऊन अनोखा तोडगा काढण्यात आला. तसेच या प्रकरणी तोडगा काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना दिले आहेत.
गणेशोत्सवादरम्यान हेवाळेकर दांपत्य कोकणातील कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे या गावी गेले होते. पण त्यांना गावात प्रवेश नाकारण्यात आला. 2006 पासून जात पंचायतीने त्यांना वाळीत टाकले होते. गावातील रुढीपरंपरांना विरोध केल्याने त्यांना गावातील लोकांचा राग सहन करावा लागला होता. त्यामुळे हेवाळेकर दांपत्य परत मुंबईला आले. घरी न जाता त्यांनी आपल्या बाप्पासह वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानासमोर काल संध्याकाळपासून ठाम मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वर्षातील गणेशाच्या पूजेसाठी हेवाळेकर दांपत्याला बोलवले.
हेवाळेकर दांपत्याच्या हस्ते अगदी यथायोग्य पूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून उपस्थित होते. यादरम्यान फडणवीसांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या वर्षीही मागितली होती दाद
गेल्या वर्षीही हेवाळेकर दांपत्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. तेव्हा फडणवीस यांचे कारवाईचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे आता यावर्षी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारातच ठाम मांडले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हातात बाप्पा घेऊन हेवाळेकर दांपत्य असे बसले होते मुख्यमंत्र्यांच्या दारी....
बातम्या आणखी आहेत...