आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी मुख्यमंत्री बोलतोय: शंभर टक्के शेतीवर उपजीविका असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यांचा उदरनिर्वाह शंभर टक्के केवळ शेतीवर चालतो अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल - मुख्यमंत्री - Divya Marathi
ज्यांचा उदरनिर्वाह शंभर टक्के केवळ शेतीवर चालतो अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल - मुख्यमंत्री
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मन की बात अर्थात मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीवर आपली भूमिका स्पष्ट केली. ज्यांचा उदरनिर्वाह शंभर टक्के केवळ शेतीवर चालतो अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यासोबतच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी 15 जिल्ह्यांमध्ये 4000 कोटी रुपयांचे प्रकल्प उभारणार असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले आहे. 
 
 
- मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात सीएम देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी कर्जमाफीनंतर नव्याने पीक कर्ज घेणाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल असे त्यांनी आश्वस्त केले. 
- कृषी क्षेत्रात गुंतवणूक करताना शेतीची उत्पादकता वाढवण्याच्या हेतूने 15 जिल्ह्यांत 4000 कोटी रुपयांचे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यांत्रिकीकरणाचा उत्पादकता वाढीसाठी कसा वापर करता येईल याकडे सुद्धा प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. 
- या कार्यक्रमाचा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीने 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच कर्जमाफीचा गैरफायदा होऊ देणार नाही असेही ते म्हणाले होते.
बातम्या आणखी आहेत...