आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे सेलिब्रेशन: नगरपालिकांंचा विजय महाराष्ट्राला समर्पित, ही लाट नव्हे सुनामी- CM

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील 25 जिल्ह्यातील 164 नगरपालिका आणि नगरपंंचायतीच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपने सेलिब्रेशन सुरु केले आहे. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केेला. नगरपालिकांमध्ये मिळालेला विजय ही एक लाट नसूून सुनामी आहे. ही सुनामी चांगल्या विचारांची असल्याचे मुुख्यमंत्री देवेेंंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शकतेच्या दृृष्टीकोनाच्या पाठीशी आहे, हे या निकालाने दाखवून दिल्याचे ही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो. भाजपचा हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो, असे ते म्हणाले.

भाजपच पहिल्या क्रमांंकाचा पक्ष असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले आहे. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सरकार कारभार करीत असून काळ्या पैशासाठी भाजप सरकारने धाडसी पाऊल उचलले आहे. देशातील काळापैसा संपुष्टात आणण्यासाठी 50 दिवस त्रास सहन करा, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले आहे.

भाजपची जोरदार मुसंंडी...
नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यात सोमवारी आक्रोश सुरू असतानाच राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची पीछेहाट करत प्रत्यक्ष आक्रोशाचीच वेळ आणली. या निवडणुकीत थेट नगराध्यक्षांची 52 पदे नगरसेवकांची 851 पदे जिंकून भाजपने पहिल्या क्रमांकावर जोरदार मुसंडी मारली. त्याखालोखाल 26 नगराध्यक्षपदे जिंकून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून काँग्रेस तिसऱ्या तर राष्ट्रवादी काँग्रेस चाैथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

एकीकडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ यांची आपापल्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठा पणाला लागली असताना त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला.

भाजप 298 वरून पोहोचला 851वर...
2011 मध्ये नगरसेवकांच्या संख्येनुसार तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने नगरसेवकनिहाय आकडेवारीच्या आघाडीवर आणि थेट नगराध्यक्षांच्या आघाडीवरही राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे भाजपने आता तळागाळातही आपले बस्तान उत्तमरीत्या मांडल्याचे स्पष्ट झाले. 2011 मध्ये झालेल्या निवडणुकीत २९८ जागांवर असलेला भाजप आता 851जागांवर पोहोचला असून 147 पैकी 52 शहरांमध्ये भाजपचे थेट नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पक्षाची ही वाढ तिपटीने झाली असून नगराध्यक्षांची संख्या तर किमान 10 पट वाढल्याचे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...