आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत्रानगरीतून...अमेरिकन वाणिज्यदूत \'नागपुरी गोंधळ\' पाहून झाले अवाक्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ असलेली संसद असो, की विधिमंडळ, या कायदेमंडळात जनकल्याणाचे प्रश्न सोडविण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आमदार- खासदारांकडून होणारा गोंधळ भारतीयांना नवीन नाही. उलट हे अधिवेशन ‘वादळी’ झाल्याशिवाय त्याची चर्चाही होत नाही. नागपुरातील हिवाळी अधिवेशनही त्याला अपवाद राहिलेले नाही.

अमेरिकेचे मुंबर्इतील वाणिज्यदूत क्रिस्टोफर ग्रॉसमन मात्र आमदारांचा हा गोंधळ पाहून मंगळवारी अवाक् झाले. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. वाणिज्यदूत क्रिस्टोफर अधिवेशनाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी विधान भवनात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर ते कामकाजाची पाहणी करण्यासाठी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत येऊन विराजमान झाले. मात्र, त्या वेळी जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. कामकाजात वारंवार व्यत्यय आणून सरकारविरोधात घोषणाबाजीही केली जात होती. नेमकं काय चाललंय हे क्रिस्टोफर यांना समजत नव्हतं, सोबतच्या अधिकाऱ्यांकडून ते माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत होते. गोंधळामुळे ते अचंबित झाल्याचे चेहऱ्यावरून जाणवत होते.

पुढील स्लाइडवर वाचा... मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी, साप साप म्हणून भुई धाेपटू नका

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...