Home | Maharashtra | Mumbai | cm devendra fadnavis delhi visits, Centre approves 107 irrigation projects of state

महाराष्ट्रातील 107 सिंचन प्रकल्पांना केंद्राची मान्यता; राज्याला मिळणार 10 हजार कोटी रुपये

प्रतिनिधी | Update - Nov 15, 2017, 02:29 AM IST

विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत मोठी सिंचन

 • cm devendra fadnavis delhi visits, Centre approves 107 irrigation projects of state
  दिल्ली दौ-यादरम्यान अर्थमंत्री जेटलींचे स्वागत करताना मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन...
  नवी दिल्ली- विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत मोठी सिंचन क्षमता निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या १०७ प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्राने तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्ली दाैऱ्यात ही माहिती दिली. यामुळे पुढील दोन वर्षांत राज्याला १० हजार कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.

  या प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्राचे साह्य मिळावे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेनंतर जेटली यांनी प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता दिली.
  औरंगाबाद, जळगाव राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण
  राज्यात मनमाड- इंदूर हा नवीन ब्रॉडगेज मार्ग, सांगली व नाशिक येथे ड्रायपोर्ट, नागपूर येथे मल्टी मॉडेल हब, मुंबई येथे रोरा सेवा आणि पुणे रिंग रोड आदी प्रकल्पांना मंगळवारी दिल्लीत मंजुरी देण्यात अाली. त्यामुळे राज्यातील रेल्वे व रस्त्यांच्या कामाला गती येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. औरंगाबाद,जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णयही घेण्यात आला.
  नाशकात ड्रायपोर्ट
  सांगली आणि नाशिक या ठिकाणी ड्रायपोर्ट उभारण्यास केंद्रीय परिवहन मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या आधी वर्धा आणि जालना येथे ड्रायपोर्टचे भूमिपूजन झाले अाहे.
  मनमाड ब्रॉडगेज
  मनमाड- इंदौर हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधून जाणाऱ्या नवीन ब्रॉडगेजच्या कामाला मंजुरी. या मार्गावरील कर्जत ते इगतपुरी, इगतपुरी ते मनमाड आणि इगतपुरी ते कसारा हा त्रिपदरी मार्ग तयार केला जाईल.
  पुणे रिंगरोड
  पुणे रिंग रोडसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून १५०० कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली . चाकण मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
 • cm devendra fadnavis delhi visits, Centre approves 107 irrigation projects of state
  बैठकीदरम्यान शिष्टमंडळ....

Trending