मुंबई - देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याला एक 'मॉडेल' मुख्यमंत्री मिळाला अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर काही दिवसांतच फडणवीस त्यांच्या वजनामुळे चर्चेत आले. मुख्यमंत्र्यांचे वजन 122 किलोंवर गेले होते. मुख्यमंत्र्यांनी वजन कमी करण्याचा निश्चय केला आणि व्यस्त दिनक्रमातही अवघ्या तीन महिन्यात त्यांनी 18 किलो वजन घटवले. डॉक्टरांचे उपचार आणि पत्नी अमृता फडणवीस यांची प्रेरणा त्यांचे शारीरिक वजन कमी करण्यात फायदेशीर ठरली आहे. त्यासोबतच फिटनेस गुरु मिकी मेहता यांच्या वर्कआऊटचा हा परिणाम आहे.
फडणवीसांनी सांभाळला डायट आणि पाळली पथ्ये
- वजन कमी करण्यासाठी फडणवीसांनी कोणत्याही बाबा किंवा बुवांच्या आश्रमाचा रस्ता धरला नाही तर, डॉक्टरांचा सल्ला आणि फिटनेस गुरुकडून व्यायामाचे धडे घेतले आहेत.
- मेटाबॉलिक आणि बॅरियाट्रीक सर्जन जयश्री तोडकर या मुख्यमंत्र्यांवर उपचार करत आहेत. औषधांसोबत शरीरासाठी योग्य डायट आणि पथ्ये ते पाळत आहेत.
- फडणवीसांनी डिसेंबरमध्ये डॉ. जयश्रींशी संपर्क केला आणि फेब्रुवारीपासून त्यांच्या उपचाराला सुरुवात झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांचे वजन 122 किलो होते.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या,
>> मुख्यमंत्र्यांच्या टार्गेट
>> कोणाची आहे प्रेरणा
>> कोण आहेत मुख्यमंत्र्यांचे फिटनेस गुरु
>> काय आहे पथ्य