आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis & Industries Minister Subhash Desai At Detroit, USA

मुख्यमंत्र्यांचा US दौरा: ‘क्रिसलर’ राज्यातील वाहन निर्मिती दुपटीने वाढविणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवेंद्र फडणवीस यांनी जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष मॅट हॉब्ज, मुख्य अर्थतज्ञ जी. मुस्तफा मोहतरेम यांची भेट घेतली. जनरल मोटर्स महाराष्ट्रात वाहनाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधनासाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. यावेळी जनरल मोटर्सच्या कार्यालयात फडणवीस व देसाईंनी अशी पोझ दिली. - Divya Marathi
देवेंद्र फडणवीस यांनी जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष मॅट हॉब्ज, मुख्य अर्थतज्ञ जी. मुस्तफा मोहतरेम यांची भेट घेतली. जनरल मोटर्स महाराष्ट्रात वाहनाच्या क्षेत्रात नवनवीन संशोधनासाठी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. यावेळी जनरल मोटर्सच्या कार्यालयात फडणवीस व देसाईंनी अशी पोझ दिली.
डेट्रॉईट (अमेरिका)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्यास अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून, वाहन निर्मितीतील जगातील आघाडीच्या क्रिसलर समुहाने महाराष्ट्रातील आपले उत्पादन दुपटीने वाढविण्यात येईल असे जाहीर केले आहे. तसेच जनरल मोटर्स उद्योग समुहानेही महाराष्ट्रात वाढीव गुंतवणूक करण्यात रस दाखविला आहे.
डेट्रॉईट येथील जनरल मोटर्स आणि क्रिसलर या वाहन निर्मिती उद्योगातील आघाडीच्या समुहांच्या मुख्यालयास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यावेळी अतिशय सकारात्मक वातावरणात चर्चा झाली. क्रिसलर उद्योग समुहाचे अध्यक्ष माईक मॅन्ले यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. जीप हा प्रसिद्ध ब्रँड तयार करणारा क्रिसलर समूह महाराष्ट्रात फियाट क्रिसलर ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून यापूर्वीच कार्यरत आहे. समुहाच्या पुण्याजवळच्या रांजणगाव येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुप्पट करून 2018 पर्यंत 2 लाख 45 हजार वाहनांची निर्मिती केली जाईल, असे मॅन्ले यांनी या भेटीत सांगितले.
जनरल मोटर्सचे उपाध्यक्ष मॅट हॉब्ज आणि मुख्य अर्थतज्ज्ञ जी. मुस्तफा मोहतरेन यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. हा उद्योगसमूह राज्यात अधिक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. नवीन वाहनांच्या आराखड्यांच्या निर्मितीच्या अनुषंगाने जनरल मोटर्स राज्यातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्याबाबत विचार करीत आहे. तसेच नियमित वाहन निर्मितीशिवाय महामार्गावरील संपर्क यंत्रणेबाबतच्या तंत्रज्ञान निर्मितीत या समूहास रस आहे. त्यादृष्टीने या भेटीत अनुकूल चर्चा झाली.
पुढे आणखी वाचा, मुंबई मीट्स मॅनहॅटन कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले....