आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी डीवायएसपी, मुख्यमंत्र्यांनी केली अाश्वासनपूर्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हस्ते विजय चौधरींना नियुक्ती पत्र दिले. - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हस्ते विजय चौधरींना नियुक्ती पत्र दिले.
मुंबई - तीन वेळचे ‘महाराष्ट्र केसरी’ जळगावचे कुस्तीपटू विजय चौधरी यांना विशेष बाब म्हणून राज्य पोलिस दलात उपअधीक्षक/सहायक पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौधरी यांना बुधवारी नियुक्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला पोलिस दलात नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा गतवर्षी नागपुरात मुख्यमंत्र्यांनी केली होती.

तीन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी
पाेलिस खात्यात मानद अधिकारी म्हणून रुजू हाेणाऱ्या खेळाडूंसाठी ३ वर्षांचा प्रशिक्षण कालावधी असताे. त्यात त्याने संबंधित खात्याच्या सेवेसाठी अावश्यक पात्रता मिळवणे बंधनकारक असते. यात फिजिकल ट्रेनिंग, अाऊटडाेअर ट्रेनिंग व कायद्याच्या परीक्षेचा समावेश अाहे. केवळ उत्तीर्ण खेळाडूंनाच सेवेत कायम ठेवले जाते. नियुक्त खेळाडूंना संबंधित पदाचे मानधन नियमित मिळते. 
 
एमपीएससी पातळीची परीक्षा 
पाेलिस खात्यातील कायदे व इतर अधिकार अाणि कर्तव्यासंबंधीची माहिती हाेण्यासाठी खेळाडूंना परीक्षा द्यावी लागते. ती एमपीएससीच्या पातळीवरची असते. कायद्याची परीक्षा कठीण असल्याने अनेक खेळाडू अर्ध्यावरच मानद पद साेडून देतात, तर काहींना सरावामुळे अभ्यासाकडे लक्ष देणे शक्य हाेत नाही.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...