आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर आले 4 हजार कोटी; मुख्यमंत्र्यांनी केले प्रमाणपत्रांचे वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने बुधवारी कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी ४.६२ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत असून १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे. याच दिवशी नियमित कर्ज फेडणाऱ्या इतर ३.७८ लाख खातेदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ३४ हजार कोटी रुपयांच्या या कर्जमाफीची सुरुवात बुधवारी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावतेही उपस्थित होते.  शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले,  आज दहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होतो, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ८.४ लाख शेतकऱ्यांनाच पैसे दिले जात आहेत. आता तीन दिवस दिवाळीची सुटी असल्याने सोमवारपासून ही प्रक्रिया सुरळीत सुरू होईल.

८.४ लाखांपैकी चार लाख ६२ हजार खाती ही कर्जमाफीची  असून ३.७८ लाख खाती प्रोत्साहनपर आहेत. आज एकूण ४ हजार कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली. त्यापैकी ३२०० कोटी कर्जमाफीचे तर ८०० कोटी रुपये प्रोत्साहनपर रकमेचे आहेत. १५ नोहेंबरपर्यंत सात बारा कोरा करण्याचे काम ७५  टक्के पूर्ण होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतीचा विकास दर उणे होता, मात्र आता  तो १२ ते १२.५ टक्क्यांवर पोहोचला असून उत्पन्नही ४० हजार कोटी रुपयांनी वाढल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वीही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली, मात्र शेतीमध्ये गुंतवणूक न केल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला. मात्र आम्ही कर्जमाफी करतानाच शेतीमध्ये गुंतवणूक करत आहोत. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा कर्ज मिळत नाही, मग तो सावकाराच्या दुष्टचक्रात अडकतो. म्हणून आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतल असेही त्यांनी सांगितले. 
 
मराठवाडा : फकिरा केशव बंधुवंत, (कवडा, ता. जिंतूर),  महादेव माणिकराव लिखे (सावरगाव, ता. जिंतूर), रावसाहेब आसाराम सांगळे (अकोला, ता. बदनापूर) सर्जेराव नाना खरात (रोषणगाव, ता. बदनापूर), अशोक शेषराव डिडोरे (धामणगाव, ता. फुलंब्री), जमनाबाई बिसन शिसोदे (गोलटगाव, ता. औरंगाबाद), शंकर विश्वनाथ सावंत (जागजी, ता. उस्मानाबाद), देविदास भानुदास इंगळे (जागजी, ता. उस्मानाबाद), जयदत्त गहिनीनाथ खोटे (वरवटी, ता. बीड), वशिष्ठ मुक्ताजी माने (ताडसोन्ना, ता.  बीड), मोहन भीमराव पाटील (रायवाडी, ता. लातूर), शंकरराव बाबूराव चाटे (हडोळती, ता.चाकूर).

पुढील स्लाइडवर...शेतकरी कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का? असे पाहा...
बातम्या आणखी आहेत...