आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीबाबा मोठे नेते, त्यांच्याबद्दल खूप आदर पण ते दिल्लीत हवेत- फडणवीसांचा चिमटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत. त्यांच्यासारखा अभ्यासू, हुशार नेता दिल्लीत हवा. दिल्ली दरबारी त्यांचे मोठे वजनही आहे. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे पण त्यांचे वजन असूनही महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प त्यांच्या काळात ते मार्गी लावू शकले नाहीत. महाराष्ट्रातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेही मात्र, जयंती नटराजन असो की जयराम रमेश असोत त्यांनी राज्यातील प्रकल्पांबाबत एकही परवानगी दिली नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या तत्कालीन यूपीए सरकारवर केली. मात्र, त्याचवेळी पृथ्वीबाबांचे कौतूक करीत चिमटा काढला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर दिले. याचसोबत विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांची सविस्तरपणे उत्तर दिले. माझे सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही मात्र कर्जमाफी देऊनही शेतक-यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत हे मागील पाच वर्षातील सरकारी आकडेवारी सांगते असे सांगत शेतक-यांना श्वाश्वत ठरणा-या उपाययोजना करण्यावर माझा सरकारचा भर आहे असे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री विधानसभेत-
- शेती व शेतीवर आधारित क्षेत्रात गुंतवणूक वाढवून शेतक-यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी माझे सरकार प्रयत्नशील
- माझे सरकार शेतक-यांना मदत करीत नाही हा जो आरोप करीत आहे तो चुकीचा आहे. मागील पाच वर्षात दरवर्षी तीन ते साडेतीन हजार रूपये दिल्याचे आकडेवारी सांगते. माझ्या सरकारनेही शेतक-यांना गेल्या वर्षी 3200 कोटी रूपयांची मदत केली आहे.
- केंद्र सरकारने महाराष्ट्राला आतापर्यंतची सर्वाधिक मदत दिली आहे.
- मेक इन इंडिया कार्यक्रम राज्याच्या विकासासाठी अतिशय गरजेची
- शेतक-यांना सामावून घेतल्याशिवाय मेक इन इंडिया अशक्य
- शेतक-यांना सक्षम करण्यासाठी विदर्भात वस्त्रोद्योग, कोकाकोलासारख्या कंपन्यांसोबत करार
- जलयुक्त शिवार योजना, घरकुल योजना, जलसिंचन प्रकल्पांना प्राधान्य
- ग्रामीण भागाचा विकास केल्याशिवाय राज्याची प्रगती नाही
- देशाच्या विकासदरापेक्षाही महाराष्ट्राचा विकास दर चांगला
- दुष्काळ असल्याने कृषी उत्पन्नात घट, मात्र, उद्योग क्षेत्रात वाढ
- धनगर समाजाला टाटा सोशल सायन्स संस्थेचा अहवाल आल्यावर आरक्षण देणार
- मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील, आघाडी सरकारने 15 वर्षे काय केले?
- राज्याला प्रगतीवर नेणारी आम्ही दूरगामी धोरणे ठरवत आहोत.
- या धोरणात्मक धोरणाचे परिणाम चार-पाच वर्षानंतर दिसतील.
बातम्या आणखी आहेत...