ठाणे - मुंबईसह १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच युतीसाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर अटी-शर्ती ठेवल्या आहेत. युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघेही सकारात्मक असल्याचे सांगितले जात असतानाच दोघेही एकमेकांना इशारे देत गोंजारण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्तेसाठी आम्हाला कोणाशीही युती करायची नसून कारभारात पारदर्शकता आणणार असाल तरच आम्ही युतीसाठी तयार होऊ, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेनेला दिला. शिवसेनेशी आमचे अनेक बाबतीत मतभेद आहेत. त्यांनाही आमच्या अनेक गोष्टी पटत नाहीत. मात्र काँग्रेसमुक्त भारताचा िवचार करताना सत्ता पुन्हा काँग्रेस आघाडीकडे जाणार नाही याची काळजी वाटत असल्याने आम्ही युती करण्यासाठी सकारात्मक आहोत, असे फडणवीस म्हणाले.
आगामी १० महानगरपालिका, २६ जिल्हा परिषद सतेच पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भाजप कार्यकारिणीची ही बैठक बोलावण्यात आली होती. केंद्रात तसेच राज्यात सत्तेत एकत्र असूनही भाजपवर विरोधी पक्षांपेक्षा आक्रमकपणे टीका करणाऱ्या शिवसेनेशी फारकत घ्या, असा पवित्रा सध्या पदाधिकारी व कार्यकर्ते घेत असताना यावर मुख्यमंत्री काय बोलतात हे महत्वाचे असताना त्यांनी युतीचा संभ्रम कायम ठेवला. काँग्रेस आघाडी सरकारने भ्रष्टाचारी कारभार करून महाराष्ट्राची लूट केली होती म्हणून त्यांना लोकांनी नाकारले आणि आमच्या हाती सत्ता िदली. ही सत्ता पारदर्शक असावी, अशी आमची भू्मिका असून आमच्याबरोबर युती करण्यासाठी इच्छुकांनीही ही गोष्ट लक्षात ठेवून आमच्यासोबत मैत्रीचा हात द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
पंतप्रधान मोदींची काळ्या पैशांविरोधातील लढाई यशस्वी करायचीअसेल तर निवडणुकांसाठी चेकच्या माध्यमातून मोठा निधी स्वीकारण्यात यावा, असे आवाहनही यावेळी फडणवीस यांनी केले. तर, छोट्या देणगीसाठी पेमंेंट गेटवे या इलेक्ट्राॅनिक माध्यमाचा उपयोग करावा. निवडणुकांसाठी भाजपाकडे किती निधी आला, याची माहिती यामुळे मिळेल. कारभार पारदर्शक होऊन तो लोकांपर्यंतही पोहवचला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अटी व जागांची संख्या पाहूनच शिवसेना घेणार निर्णय : एक बैठक घेतली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकांसह अन्य महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. भाजपा युतीस तयार असल्याने आणि उद्धव ठाकरेही युती करण्यास सकारात्मक असल्याने युतीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. भाजपकडून ११० ते ११५ जागा मागण्यात येणार असून त्यापैकी १० ते १५ जागा रिपाईंला देण्यात येणार आहेत. भाजपला जर १०० पेक्षा जास्त जागा दिल्या तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढू शकते त्यामुळे १०० च्या आत जागा द्यावा असा सूर शिवसेना नेत्यांचा आहे. गेल्या वेळेस शिवसेना २२७ पैकी ७५ जागा जिंकली होती तर भाजपला फक्त ३१ जागा मिळाल्या होत्या. तर रिपाइं फक्त एका जागेवर निवडून आली होती. त्यामुळे भाजपला जास्त जागा दिल्यास त्यांच्या नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि भविष्यात शिवसेनेला त्याचा फटका बसू शकतो. भाजपचे आमदार जास्त असल्याने ते जास्त जागांची मागणी करतील त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे याचा विचार करूनच जागा वाटपाचा विचार करावा असे बैठकीत ठरल्याचे समजते.
अटी व जागांची संख्या पाहूनच शिवसेना घेणार निर्णय
मुंबई महानगरपालिकेच्या पारदर्शी कारभाराच्या अटीवर भाजप शिवसेनेशी युती करण्यास तयार झाली असली तरी त्यांच्या अटी आणि जागांची संख्या पाहूनच शिवसेना भाजपशी युती करील. शिवसेनेलाही भाजपशी युती करावयाची आहे; परंतु त्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवला जाऊ नये असे मत शिवसेना नेत्यांनी व्यक्त केले असून पुढील आठवड्यात कदाचित युतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांबरोबरउर्वरित. पान १०
एक बैठक घेतली. या बैठकीत मुंबई महानगरपालिकांसह अन्य महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. भाजपा युतीस तयार असल्याने आणि उद्धव ठाकरेही युती करण्यास सकारात्मक असल्याने युतीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. भाजपकडून ११० ते ११५ जागा मागण्यात येणार असून त्यापैकी १० ते १५ जागा रिपाईंला देण्यात येणार आहेत. भाजपला जर १०० पेक्षा जास्त जागा दिल्या तर भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढू शकते त्यामुळे १०० च्या आत जागा द्यावा असा सूर शिवसेना नेत्यांचा आहे. गेल्या वेळेस शिवसेना २२७ पैकी ७५ जागा जिंकली होती तर भाजपला फक्त ३१ जागा मिळाल्या होत्या. तर रिपाइं फक्त एका जागेवर निवडून आली होती. त्यामुळे भाजपला जास्त जागा दिल्यास त्यांच्या नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि भविष्यात शिवसेनेला त्याचा फटका बसू शकतो. भाजपचे आमदार जास्त असल्याने ते जास्त जागांची मागणी करतील त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे याचा विचार करूनच जागा वाटपाचा विचार करावा असे बैठकीत ठरल्याचे समजते.
चर्चेसाठी दोन्ही पक्षांची समिती
युतीच्या चर्चेसाठी भाजपने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची समिती नेमली असून शिवसेनाही उद्योगमंत्री सुभाष देसाई, सुनील प्रभू आणि अनिल देसाई यांची समिती नेमण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या समितीची लवकरच बैठक होणार असून पुढील आठवड्यात कदाचित युतीची घोषणा होऊ शकते, अशी माहितीही शिवसेनेतील सूत्रांनी दिली.
पुढील स्लाइडवर वाचा, कार्यकर्त्यांना युतीचीचिंता नको, लोकांत जा....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)