आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 लाख शेतक-यांच्या बॅंक खात्यात साडेसहा हजार कोटी भरले- देवेंद्र फडणवीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी द्यायला थोडा उशीर जरूर झाला आहे. मात्र, सर्व अडचणींवर मात करून आजच (शनिवारी) राज्यातील 15 लाख 42 हजार शेतक-यांच्या बॅंक खात्यावर साडेसहा हजार कोटी रूपये जमा केले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर येथे दिली.

 

मुख्यमंत्री सध्या कोल्हापूर दौ-यावर आहेत. वारणानगर येथील जाहीर व हजारो लोकांच्या उपस्थित कार्यक्रमात त्यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी नागरिकांनी शेती, रोजगार, शिक्षणाबाबत फडणवीस सरकारचं धोरण काय? यावर प्रश्न विचारले. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास उत्तरे दिली. याच दरम्यान फडणवीस यांनी आम्ही राज्यातील 15 लाख 42 हजार शेतक-यांच्या बॅंक खात्यात साडेसहा हजार कोटी रूपये भरल्याची माहिती दिली. उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि अजित पवारांनी आज शेतकरी कर्जमाफीवरून फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत हल्लाबोल केला होता. मात्र, अखेर सरकारने शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी वारणानगरमध्ये केली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वांत मोठ्या आणि पारदर्शी, ऐतिहासिक कर्जमाफीसाठी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आजच आम्ही 15.42 लाख शेतकर्‍यांसाठी 6500 कोटी रूपये बँकांमध्ये जमा केले आहेत. येणार्‍या 15 दिवसांत उर्वरित सर्व शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येतील. कौशल्य प्रशिक्षणासाठी हाती घेण्यात आलेले कार्यक्रम, त्यातून निर्माण झालेल्या रोजगार संधी, शाश्वत सिंचनाच्या निर्माण करण्यात आलेल्या सोयी, सर्वांसाठी घरे, गावांचा विकास, दूध उत्पादकांचे प्रश्न अशा विविध विषयांवर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 15000 महिला बचत गटांना 102 कोटी रूपये गेल्या 3 वर्षांत उपलब्ध करून देण्यात आले असून, या बचत गटांतील उत्पादनांसाठी स्वतंत्र मॉल्स उभारण्यासाठीही सरकार कारवाई करीत आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, फडणवीस यांचे कोल्हापूर दौ-यातील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...