आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यकारणीची आज बैठक,मंत्र्यांच्या हकालपट्टीवर निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी)  संध्याकाळी 6 वाजता भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीत भ्रष्टाचाराच्या आरोप असलेल्या मंत्र्यांच्या हकालपट्टीवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळातील खांदेपालटावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यांवर
घोटाळ्याचे आरोप आहेत. विशेष म्हणजे त्यांनी राजीनाम्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी दोघांचा राजीनामा स्विकारला नाही. मुख्यमंत्री मंत्र्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असा सावध पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे. मात्र विरोधकांनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रावसाहेब दानवे आणि विष्णू सावरा यांचीही गच्छंती?
सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाला अडचणीत आणले आहे. तसेच पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला असून चार महिन्यांत 600 आदिवासी मुले दगावली आहेत. त्यामुळे देशभरात राज्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत. त्यामुळे सावरांना आपला कारभार आवरावा लागण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...