आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या गाडीला अपघात, अमृता फडणवीस सुरक्षीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या कारला शुक्रवारी सायंकाळी लोअर परळ भागात एका गाडीने धडक दिली. या अपघातात अमृता यांना दुखापत झालेली नाही, मात्र त्यांच्या इनोव्हा कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अमृता फडणवीस शुक्रवारी ऑफिसहून घरी जात असताना लोअर पऱळ भागात काँक्रिट मिक्सर असलेल्या जड वाहनाने त्यांच्या कारला उजव्या बाजूने धडक दिली. यामुळे त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली किंवा नाही या बद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रस्त्यावर अधिक वर्दळ होती आणि काँक्रिट मिक्सर ओव्हर टेकचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला.
फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवशनासाठी कोल्हापूरात आहे.

अमृता नागपूरचे प्रसिद्ध स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या आहेत. देवेंद्र आणि अमृता यांना देविजा ही एक मुलगी आहे. अमृता बँकर आहेत. फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी त्या नागपूरमध्ये कार्यरत होत्या. नुकतीच त्यांनी मुंबईत बदली करुन घेतली आहे.