आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Devendra Fadnavis Wishes People Of State On The Occasion Of Gudi Padwa

महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी संकल्पाची गुढी उभारूया- मुख्यमंत्र्यांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठी नववर्षाचा प्रारंभ असणा-या गुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याला विविध क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये सक्रीय सहभाग देऊन महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. गुढी उभारून या नव्या वर्षाचे स्वागत करण्याची आपली परंपरा आहे. चैत्र महिन्यापासून निसर्गात होणाऱ्या चैतन्यदायी परिवर्तनाच्या स्वागताचाही उद्देश या उत्सवामागे आहे. समस्त मराठीजनांनी या नववर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी सुरू असलेल्या कृतीपर्वात सक्रीय होण्याचा संकल्प करावा.