आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी सोडला दुसरा सरकारी बंगला, अन्य मंत्र्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानातूनच सर्व कामकाज होत असल्याने आणखी एका बंगल्याची आवश्यकता वाटत नाही. अन्य मंत्र्यांना निवासासाठी हा बंगला उपलब्ध व्हावा म्हणून अापण शिवनेरी या शासकीय बंगल्यावरील ताबा साेडला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांकडे गृह विभागासह अनेक खाती असल्याने त्यांना वर्षा बंगल्याच्या बाजूलाच असलेला शिवनेरी हा शासकीय बंगलाही देण्यात आला होता. याबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

वर्षा आणि शिवनेरी असे दोन शासकीय बंगले मला देण्यात आले होते. शिवनेरीमधून कार्यालयीन कामकाज पाहावे अशी अपेक्षा होती. परंतु वर्षा बंगलाच प्रचंड मोठा असल्याने आणि तेथून सर्व कामकाज होत असल्याने दुस-या बंगल्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मी तो बंगला न घेण्याचे ठरवले आहे.

काही मंत्र्यांना अजूनही बंगला मिळाला नसल्याने शिवनेरी बंगला एखाद्या मंत्र्याला उपलब्ध व्हावा अशीही माझी इच्छा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. अाघाडी सरकारच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे वर्षा व ताेरणा या दाेन्ही सरकारी बंगल्यांचा ताबा हाेता.